ह़ा ब्लॉग आपले लाडके सदगुरु श्री अनिरुद्ध जोशी [ बापू ] हे आपल्या औरंगाबाद शहरात दिनांक १२ डिसेंबर २०१० रविवार ह्या दिवशी आले होते त्या दिवसाला आज एक वर्ष पूर्ण झाले ! त्या सर्व आठवणी आज ही प्रत्येकच्या मनात ताज्या आहेत आणि आयुष्यभर ताज्याच असतील हयात शंका नही हरी ओम , VIDEOS आणि फोटोस लवकरच अपलोड केले जातील ! सर्वांनी आनंद लुटावा हीच बाप्पा चरणी प्रार्थना ...! हरी ॐ
Saturday, November 27, 2010
हरी ओम
दिनांक १२ डिसेंबर २००९ ला सदगुरु श्री बापूंनी डीक्लीअर केलेले आम्हाला समजले की , " हो , मी औरंगाबाद ला येणार ! " बाप्पाच्या ह्या वाक्यातल प्रेम ,त्याच ते अनन्यप्रेमस्वरूप आज आम्ही सर्व जण इथे अनुभवत आहोत ! खर म्हणजे जेव्हा ही इच्छा देवाच्या मनात उत्पन्न झाली, तेव्हाच ह्या अनिरुद्ध सोहळयाची जोरदार तयारी करण्याची वात्सल्यशक्ति आम्हास आल्हादिनीस्वरूप नंदाईकडून
मिळाली होती , पण आता आमच्या लेव्हल वर, आमच्यातल्या प्रेमपूर्ण भक्तिभावाने सर्व व्यवस्था करण्याची वेळ आली होती आणि जी गोष्ट कधी स्वप्नात ही विचार केली नव्हती , अशी संधी बापुराया आपल्यालापण देइल अशी काही कल्पना ध्यानीमनी नसताना, देवाच्या गावाहून हा असा निरोप आला अणि फ़क्त औरंगाबादकरांच्याच नव्हे तर धुळे ,पुणे , नंदुरबार इथल्या सुद्धा बापू भक्तिसागराला उधाण आले! अणि चालू झाली ती जोरदार तयारी....! आज आपल्या घरी जर साधा पाहुणा येणार म्हणल्यावर आपण घरात किती तयारी करतो अणि अरे हा तर आपला देव! साक्षात् तो येतोय म्हणल्यावर मग काय विचारायच ?
कधी उपासनेहून आलो किंवा मुंबई हून एखादा उत्सव अटेंड करून आलो तर माझ मन हेच विचार करायचं कि , अरे आपला बापू केव्हा येईल औरंगाबादला , खरच असं होईल का ? आल्यावर बापू कुठे बसतील कुठे राहतील , त्यांचा समोर बसून लाइव्ह उपासना करायला मिळेल ???? हा ब्लॉग वरील बापुभक्तांशी संवाद मी करतोय म्हणून इथे मी स्वतः किंवा माझ मन असा उल्लेख केलाय , पण खरतर ह्या अथांग बापू परिवारातील ह्या बापुप्रेमाच्या आपल्या भक्तीगंगेतील प्रत्येक म्हणजे अगदी प्रत्येक बापू भक्ताच्या मनात एकच सुप्त इच्छा असते कि , " आपला बापू आपल्या गावाला येईल ? " अरे तो तर इथेही आहे आणि तिथेही आहे हे आपण जाणतोच , पण हे आपल मानवी मन आहे ! ते काही इतक्या सहज सहजी मानत नाही,पण बाप्पाच्या लाडक्या लेकरांनी अशी इच्छा मनात धरणे ह्यात गैर असे काहीच नाही तो भाव ती आर्तता आपल्याकडे हवीच! जो श्रद्धावान ह्या बापुरायाच्या भक्तीगंगेत उभा राहिला कि त्याचा भाव कसा दृद्ग करायचा आणि त्याला वर कसा न्यायचा ह्याची सर्वस्वी जबाबदारी त्या आपल्या सदगुरुरायाची! आपला हा बापू साक्षात ग्वाही देतोय दर गुरुवारी ओरडून सांगतोय पण तरीही आपला मन मानायला काही तयार होत नाही त्या वेळेस मात्र आपल्या ह्या देवाला काहीतरी खेळ मांडावा लागतो, आणि मग हा आपल्या लेकरांवर अनन्यतेने प्रेम करणारा,आपणा सर्वांना अकारुण करुण्याच्या महासागरात मनसोक्त डूमबवणारा, आपल्याला मनः सामर्थ्य देऊन आपले शारीरिक अणि मानसिक बल वर्धन करणारा, आपल्या बाळांना हाक मारण्याचे ही कष्ट पडू नयेत ह्या साठी वेळेआधी धावत येऊन सावरणारा ! असा हा आपला देव! सदगुरू श्री अनिरुद्ध बापू आपल्या लेकरांच्या, आपल्या श्रद्धावान मित्रांच्या हट्टाखातर आपल्या औरंगाबाद नगरीत आपल्या संभाजीनगर शहरात येण्यासाठी केव्हाच सिद्ध झालाय ! पण आता वेळ आहे ती आपण सिद्ध व्हायची, श्री अनिरुद्धांच्या सिद्धतेला काळाचे वेळेचे बंधन नाही ! तो आपल्या प्रियजनांसाठी सदैव सिद्धच असतो ! पण आता आपण सर्वांनी ह्या संधीचा "सद" उपयोग करून घ्यावा अशी आमची एक मित्र म्हणून , एक हितचिंतक म्हणून इच्छा आहे.
येथे कुणालाही कसले ही बंधन नाही हे इथे मला सर्वात आधी स्पष्ट करावयाचे आहे, इथे असा कोणताही नियम तुम्हाला अडवू शकत नाही कि तुम्ही दीक्षा घेतलेली आहे का ? इत्यादि. ज्यांना म्हणून डॉ,अनिरुद्ध धैर्यधर जोशी. एम. डी. (मेडिसीन ) अर्थात सदगुरू श्री अनिरुद्ध हे आता साजऱ्या होणाऱ्या सोहळ्यात आपल्या ब्रम्हवाणीद्वारे प्रवचनातून श्री दत्तगुरूंचे प्रेम आदिमाता चंडिकेचे वात्सल्य याची प्रत्यक्ष प्रचीती कशा प्रकारे अनुभवण्यास देतात हे पहायचे असेल अनुभवायचे असेल, अशी पवित्र इच्छा घेऊन येणाऱ्या प्रत्येक श्रद्धावान जनसामान्य भक्तांचे स्वागत करण्यासाठी सदगुरू श्री अनिरुद्ध उपासना फौंडेशन , औरंगाबाद आणि अनिरुद्धाज अकेडमी ऑफ डिझास्टार मेनेजमेंट कटिबद्ध आहे.
अख्या भारतवर्षात नव्हे तर परदेशात सुद्धा श्री अनिरुद्धांचे नाव आजच्या युगातले व्यवसायाने, शिक्षणाने डॉक्टर असे अध्यात्मिक सदगुरू असे सर्वांना परिचित होत आहे , ह्या काही गोष्टी आपल्याला समजल्यावर आपल्या मनात प्रश्न पडणे साहजिकच आहे कि, हे बापू कोण आहेत ? हे नेमके काय करतात ? काय सांगतात ? तर थोडक्यात सांगायचे तर ,
बापूंनी आज पर्यंत अनेक प्रवचनातून वारंवार एकच गोष्ट सांगितली आहे ती गोष्ट आधी आपल्याला नीट समजावून घेतली पाहिजे " मी तुमचा मित्र आहे, परमेश्वरी तत्वांवर नितांत प्रेम असणाऱ्या प्रत्येकाचा मी दास आहे. माझाकडे आहे प्रेम ...प्रेम आणि प्रेमच, माझाकडे दुसरे काहीही नाही " आता पहा हा सदगुरू आपल्याला मित्र म्हणतोय स्वतःला कुठलीही महान उपाधी न लावून घेता स्वतःला आपल्या सारख्या जनसामान्यांचा मित्र म्हणवून घेतोय,आणि पुढे काय सांगितलाय कि परमेश्वरी तत्वांवर नितांत श्रद्धा म्हणजे काही भाकडकथा किवा अंधश्रद्धेवर आस्था नव्हे. सरळ शब्दात सांगायचे तर एखादी आई , माता जशी आपल्या लेकरावर लाभेविण प्रेम करते, निर्व्याज प्रेम करते तिला काहीही लाभ होणार नसतो म्हणजे त्या आपल्या बाळावर प्रेम करताना ती कुठल्या पुढच्या फायद्या च्या विचार करत नसते हे माझ बाळ! बस्स फक्त एवढा एकच भाव तिच्या मनावर राज्य करत असतो आणि त्याच भावनेने ती बाळाला सांभाळत त्याचे पालन पोषण करत असते. तर सदगुरू बापू भक्तीचे अगदी हेच सोप्पे उदाहरण आपल्या समोर ठेवून त्या परमात्म्याची भक्ती , सेवा संसारात राहून कशी करायची, त्याच्या विषयी चा भाव मनात कसा प्रगटवायचा हेच अगदी सहजपणे सांगतात आणि महत्वाची गोष्ट ही कि तो भगवंत आणि तुम्ही स्वतः ह्या तुमच्या दोघात दुसरा कोणीही एजंट नसतो आपले डायरेक्ट नाते त्याचाशी जोडलेले असते हे ही सांगतात.
कलियुगाचा महिमा तर आपल्या सर्वांनाच माहित आहे ! ह्या कलियुगातल्या वाईट प्रवृत्तीपासून आपले, कुटुंबाचे आणि ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे संरक्षण करण्यासाठी सदगुरू बापूंनी अनेक उत्सव आयोजित केले होते जसे गणेशयाग, विविध पवित्र क्षेत्रांच्या भावयात्रा रसयात्रा, गायत्री महोत्सव , जगन्नाथपुरी उत्सव , दत्तयाग ,महिषासुरमर्दिनी उत्सव इत्यादी आणि असे उत्सव बापू आपल्यासाठी पुढे भविष्यात ही करतच राहणार आहे . गोष्ट अशी आहे कि बापू आपल्या साठी खूप काही करतात पण त्यात आपण किती शारण्य्य भावाने किती सेवा भावाने सहभागी होतो ! कि सहभागी होतच नाही हे आपण पहिले पाहिजे , आपल्या संसारिक अडचणीत अडकून त्याची कारणे देऊन आपण अश्या संधी आयुष्यात दवडत राहतो. पण जेव्हा आपल्या वर वेळ येते न तेव्हा आपली माती कुंठीत होते आणि नेमका त्याच वेळी आपल्याला कोणीतरी ढोंगी भेटतो पण जेव्हा आपल्या लक्षात येते कि अरे ह्याचा काही फायदा नाही तो पर्यंत वेळ निघून गेलेली असते आणि आपला विश्वास ही उडून गेलेला असतो. ह्याच चक्रात हा कलियुगात जन्म घेतलेला मानव अडकत राहतो आणि स्वतःच्या नशिबाला दोष देत जन्मभर रडत राहतो. मग साहजिकच त्या भगवंतापासून त्या अनन्यप्रेमस्वरूप कारुण्यमयी कृपा छत्रापासून
दूर जातो आणि शेवटी त्याच ८४ लक्ष योनींच्या फेर्यात अडकून पडतो. ह्या फेऱ्यात आपल्याला परत परत अडकवणारी एकच गोष्ट आहे ती म्हणजे आपले मागील जन्मींचे दुष्कर्म, दुशप्रारब्ध जे आपल्या आकलनाच्या पलीकडले असते, त्यातून कसे सुटायचे ह्याचा रस्ता दूरदूर पर्यंत कुठेच दिसत नाही किंबहुना आपण अडकलोय कशात हेच मुळी
आपल्याला माहित नसते तर मित्रांनी आपल्या लाडक्या सदगुरूंनी आपल्याला स्पष्ट शब्दात ग्वाही दिली आहे कि, " मी योद्धा आहे ! आणि ज्यांना ज्यांना म्हणून आपल्या प्रराब्धाशी लढायचे आहे त्यांना युद्धकला शिकवणे हा माझा छंद आहे ! " इतक्या सरळ शब्दात जर बापूंनी आपल्याला ग्वाही दिली आहे , तर मला अजून काही जास्त सांगायची गरज नाही. जाता जाता सांगायचे एवढेच कि, असे हे सदगुरू श्री अनिरुद्ध बापू दिनांक १२ डिसेंबर २०१० रोजी औरंगाबाद येथे येत आहेत आणि मराठवाडा सांस्कृतिक मंडळ , खडकेश्वर औरंगाबाद येथे संध्याकाळी ६ वाजता सदगुरुंचा प्रवचन , सत्संग व दर्शन सोहळा आयोजित केला गेला आहे तरी आपण सर्वांनी त्याचा आनंद लुटण्यासाठी प्रयत्न करावा .बाकी सोहळ्या विषयक माहिती दररोज अपडेट केली जाईल.
हरीओम
बापूंच्या भक्तीगंगेतील एक बाळ .
|| जे आले ते तरुनी गेले, जे न आले ते तसेच राहिले ||
Subscribe to:
Posts (Atom)