बापुंची वचने 1)अनिरुद्ध क्षेत्री जो आला शरण,तयासी कैसा भय दुःख भार 2)श्रद्धावान हाची माझा मित्र सखा,तयासी मी रक्षिन देवयान पंथी 3)ग्रंथराज हाची जयाचे अनुसंधान,तयाचा योगशेम मीची वाहे 4)जान मी न कधी टाकीन तुजसी,देईन नित्य मनः सामर्थ्य बल बुद्धि 5)मर्यादा हाची जयाचा तारक मार्ग,तयाचा मी आश्रय सर्वकाळ 6)जो जो मज स्मरे दृढ़भावे,तयासी आनंदघन देईन मी 7)मज सवे जो प्रेमे येइल,तयाचे अशक्य शक्य मी करीन 8)तू वानर मी मित्र तुझा खचित,रावण मरणार जान तू निश्चित 9)जेथ सेवा भक्ति शारन्य राहे,तेथ तेथ दाऊ नंदा अनिरुद्ध राहे

Thursday, December 2, 2010

दिनांक २३ ऑक्टोबर २०१० सर्व उपासना केंद्रामधील बापूभक्तांचा सत्संग, विशेष उपस्थिति पूज्य समीरदादा.


दिनांक २३ ऑक्टोबर २०१० रोजी औरंगाबादेत शहरातील सर्व सदगुरु अनिरुद्ध उपासना केंद्रामधील बापूभक्तांचा सत्संग मेळावा आयोजित केला होता , १२ डिसेंबर २०१० रोजी औरंगाबादेत होणारया अनिरुद्धसोह्ळयाच्या तयारितिल हा कार्यक्रम सुद्धा एक भाग होता।

अतिशय भक्तिमय वातवरणात बापू ,नंदाई आणि सुचितदादांच्या कृपेने अणि इच्छेने हा कार्यक्रम पार पडला, आणि आम्हा सर्वांसाठी विशेष पर्वणी अशी होती की, स्वत: बापूंनी मुंबई हुन आम्ही केलेली तयारी पाहण्यासाठी, आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी स्वत: समिरदादा आणि टीम ला औरंगाबादला जाउन या असे सांगितले होते।
कोजागिरी पोर्णिमेच्या दरम्यान मी येणार असे दादांनी कळवले होते, दादा येणार त्यामुले सर्वांचीच जोरदार तयारी चालू झाली होती , आणि १२ डिसेंबर च्या कार्यक्रमाच्या तयारीने आता चांगलाच वेग घेतला होता आणि समिरदादा त्याचाच फोलो अप घ्यायला आणि आमचा उत्साह वाढवून प्रोत्साहन द्यायला येणार होते !

आता दादा येणार म्हणल्यावर सत्संग आणि औरंगाबाद शहरातील सर्व उपासना केंद्रातील बापूभक्तांचा मेलावा आयोजित केला गेला। त्यासाठी शहरातील सिड्को एरियामधील कुलस्वामिनी मंगल कार्यालय हे स्थळ ठरविले गेले। ह्या कार्यक्रमाच्या सत्संगाची, अभंगांची प्रक्टि सुद्धा जोमाने सुरु होती। दिनांक २२ ऑक्टोबरला दादांच शहरात आगमन झाल । आणि त्याच दिवशी संध्याकाळी दादांनी सर्व केंद्रावरच्या यंगस्टार्स ची मीटिंग बोलावली असा सुचित केला गेला, तत्काल सर्वांना धडाधड मेसेज गेले अणि संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सर्व तरुण मंडळी दादा जिथे थांबले होते तिथे मीटिंग साठी जमा झाले। मीटिंग हॉल मधे प्रवेश करताच समोर जे दृश्य दिसले ना ते पाहून आमच्या प्रत्येकाच्या तोंडून आह्हा........ असे शब्द नकळत बाहेर पडले ! एखाद्या कंपनीच्या बिझनेस मीटिंग चेंबर मधे जशी अरेंजमेंट असते ना अगदी तशी व्यवस्था करून ठेवली होती ! अगदी पॉश टेबल , चेअर्स व्हाइट क्लोथ लावून मस्त ! आम्ही तिथे जाउन पटापट आपल्या जागा पटकावून बसलो, आणि काही क्षणातच प. पू समीरदादांचे हॉल मधे आगमन झाले ! त्याचवेळी दादांना पाहताच प्रसन्न पण "गंभीर" वातावरण तिथे निर्माण झाले आणि आम्ही सर्वजाण आपण वर्गात शिक्षक आले आले की कसे उभा राहतो ना तसे उठून उभा राहिलो , ते पाहून चेहरयावर स्मितहास्य आणून दादा १ वाक्य बोलले " अरे रे अरे बसा रे असे उठून काय उभा राहता? आपण सर्व एकच आहोत , आणि आपल्याकडे अशी पद्धत नाहीये बसा बसा सगळे " हे वाक्य ऐकताक्षणीच आम्हा सर्वांच्या मनात एक जाणीव झाली की अरे ही काय मीटिंग नाहीये ही काहीतरी वेगळीच गम्मत आहे !

समिरदादा, आपले सीईओ सुनिलसिंह मंत्री, त्यांचा सोबत आलेले गौरांगसिंह वागले, कपिलसिंह शिरोडकर इत्यादी मंडळी आपापल्या जागेवर बसले।
आम्हा सर्वांच्या मनात प्रश्नांनी गर्दी केली की अरे अशी अचानक मीटिंग का ठेवली असेल दादांनी ? आता ते आपल्याला काय काय प्रश्न विचारतील ? मग आपण कसा अणि काय उत्तर दयायच ? आता मार्गदर्शन म्हणजे नेमका काय सांगणार दादा ? इत्यादी । आम्ही सर्वांनी आपापले पेन आणि डायरी काढल्या आणि आपल्या नेहमीच्याच शैलीमधे दादांनी शांतपणे बोलायला सुरुवात केली।

" हरी ॐ , मी इथे काही तुम्हाला मार्गदर्शन करायला, काही शिकवायला आलेलो नाही तर आज तुम्ही सर्वांनी बोलायच आणि मी ऐकणार, आज तुम्ही प्रश्न विचारायचे आम्ही सर्व त्याचे निरसन करणार! आपण आज फ़क्त गप्पा मारणार आहोत ! [ अर्थात आमची ही मीटिंग म्हणजे दादांसोबत तरुण वर्गाचा अनिरुद्धगुणसंकिर्तानाचा
एक सत्संगच झाला ]
दादा म्हणाले आपण आजची ही सुरुवात आदिमाता स्तवनाने करुयात! दादांसोबत अतिशय भक्तिभावाने स्तवन म्हणून झाल्यावर खरया मीटिंग ला सुरुवात झाली।

खरतर सुरुवात दादांनीच केली, आणि हलू हलू एक एक पैलू उलगडत सदगुरु बापूंविषयी अश्या काही गोष्टी सांगितल्या की जय गोष्टीतून खरच प्रत्येक मानवाला काहीतरी शिकण्यासारखे होते ! आणि त्या गोष्टी आम्ही आमचा ग्रुप मधे , आमच्या मित्रमंडळी मधे बापूंविषयी जाणून घेण्याची खरोखर इच्छा असलेल्या श्रद्धावानाना त्या गोष्टी आम्ही अगदी सहजपणे नक्कीच सांगू शकतो अश्या होत्या . अगदी लक्षात राहिल असे काही गोष्टिंपैकी एक म्हणजे दादांनी आम्हाला आपल्या बापूंच्या अहिल्या संघाविषयी खुप महत्वपूर्ण माहिती आणि तिथे ट्रेंड झालेल्या वीरांचे अनुभव ही सांगितले। त्याचबरोबर बापू बल च्या विद्यार्थ्यांकडून कसा व्यायाम करून घेतात, आपल्या प्रत्येक लेकराचा कस लागावा, शारीरिकदृष्टयासुद्धा आपला बाळ जिबात मागे असू नये ह्या धेयापोटी बापू कसा मेहनत करून घेतो , फारशी ओली होईपर्यंत कसा ज़ोर काढून घेतो हे ऐकताना मज्जा आली !
त्यादिवशी दादा बापूंविषयी भरभरून बोलले, आणि त्या गमतीजमती ऐकून आपल्या बाप्पाविषयी अधिक जिव्हाळा दाटून आला.

दादांचे बोलणे झाल्यावर दादांनी आता आम्हाला बोलायला संधि दिली , मग त्या वेळी कोणी दादांना काही प्रश्न विचारले तर कोणी आपल्या छान छान कल्पना मांडल्या। आमचा जो काही थोडाफार उत्साह होता तो पाहून दादाही आनंदित झाले, उत्साह थोडाफार होता असे मी म्हणालो म्हणजे दादांसमोर बोलणेच बरयाच जणांना जमत नव्हते, कारण ही चर्चा ही मीटिंग हे मार्गदर्शन ज्या मोकलेपणाने चालले होते तरीही , एक आदरयुक्त भीती सर्वांच्या मनात होती. आता मात्र पुढे मज्जा झाली गप्पा मरता मारताच दादा बोलले आपण इथेच जागेवर बसल्या बसल्या एक छोटासा ब्रेक घेऊ, तुम्ही जरा एकमेकात चर्चा करा मग आपण पुन्हा बोलूया असे बोलल्यावर दादांनी कोणाला तरी हाक मारली आणि अशी खूण केलि आणि बोलले की, "अरे ते आपण आणलेला खाऊ द्या की सर्वांना!" अहो सांगायची मज्जा अशी की स्वतः दादांनी आमच्यासाठी सोनपापड़ी आणि जिलेबी आणली होती मस्त ! मग ते सर्वांना घ्यायला लावला, सर्वजण तिथेच मीटिंग मधे खायला लाजत होते, दादा म्हणाले " अरे खा की काय लाजता ? अरे खा की तुमच्याचसाठी आणले ते !."शेवटी काही वेळात बऱ्याच जणांनी आपल्या काही कल्पना दादांसमोर मांडल्या जसे जास्तीत जास्त भक्तांना ह्या कार्यक्रमाचा आनंद घेता यावा त्याविशयक ब्लॉग विषयी माहिती आणि परवानगी, स्टेज डेकोरेशन विषयी संकल्पना इत्यादी. दादांनी अगदी सर्वांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन अगदी मनापासून सर्वांचे समाधान केले. अशी धमाल मस्ती करत आमची मीटिंग साधारण १ तास चालली . मीटिंग चा शेव शांतीपाठाने झाला. हॉलमधून बाहेर पडताना आम्हा सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान वेगळाच आनंद भरून वाहत होता. सर्वजण मग आपापल्या घरी गेले, आणि वाट पाहायला लागले ती २३ ऑक्टोबर ची .....

दुसरा दिवस उजाडला ठरलेल्या वेळेप्रमाणे सर्व डि. एम. व्हीज, कार्यकर्ते कार्यक्रमस्थळी जमायला सुरुवात झाली. सगळी तयारी आदल्या दिवशीच बऱ्यापैकी पूर्ण झाली होती. कार्यक्रमस्थळी भक्तांच्या नोंदणी साठी टेबल मांडले गेले होते व तिथे प्रवेश द्वारावारच भक्तांची नोंदणी चालू होती.




















मुख्य
हॉलमध्ये प्रवेश करताना आपल्या संस्थेच्या उपक्रमांची माहितीफलक लावण्यात आले होते.येणारा प्रत्येकजण आवर्जून ते पाहत होता,गुढ्या , तोरणे , आकाशकंदील अगदी सणावारा प्रमाणे वातावरण तिथे निर्माण झाले होते बापूंची रांगोळी तर सर्वांचेच मन मोहून घेत होती. हॉलमध्ये प्रवेश करताच समोर बापुराया विराजमान झाले होते ! बापूंचे मोट्ठे कटओउट, मूर्ती सुंदर पद्धतीने प्रकाशयोजना करू सजवण्यात आले होते . साधारण :३० वाजल्यापासून भक्तमंडळींची लगबग वाढली होती, आणि त्याच वेळी विजयमंत्राने गजरास सुरुवात झाली, जसा गजर चालू झाला आणि धुपाने वातावरण प्रसन्न झाले होते आणि भक्त मंडळी गजरात उत्साहाने सामील झाली होती , नवीन भक्तांची संख्या चांगलीच होती हे लक्षात येत होते ! सर्वजण तल्लीन झाले होते. जसा जसा वेळ जाईल तसा गजराचा ठेका वाढत चालला होता, कार्यक्रमस्थळ भक्तीगंगेने भरून चालले होते, अल्पोपहाराची व्यवस्था केली गेली होती , ज्याला वाटेल तो अगदी स्वतः जाऊन हवे ते पदार्थ घेऊ शकेल अशी व्यवस्था केली होती, आमची सर्वांची एकच धावपळ चालू होती आणि आता प्रतीक्षा होती ती दादांच्या आगमनाची....












बरोबर
६ वाजता काही भक्तमंडळी मुख्य द्वारावर दादांच्या स्वागतासाठी दोन्ही बाजूलाभी राहिली आणि आतमध्ये गजराने वातावरण भक्तीने धुंद झाले होते सर्वच जण जोरदार गजर करत होते आणि बरोबर ६:२० मिनिटांनी परमपूज्य दादांचे आणि टीम चे तिथे आगमन झाले , दादांचे हॉलमध्ये आगमन होताना विठ्ठलनामाच्या गजराने जोरदार ठेका धरला होता, बापुरायाचे अनन्यप्रेमस्वरूप अस्तित्व अगदी जाणवत होते आणि काही वेळातच गजर थांबला आणि आलेल्या सर्व मुख्य व्यक्तींनी सदगुरू पादुकांचे दर्शन घेऊन आपापल्या जागेवर बसले व दादा व्यासपीठावर गेले आणि ६:३० वाजता दादांनी बोलायला सुरुवात केली.

अगदी मोकळेपणाने दादांनी काही क्षणातच सर्वांना आपलेसे करून घेतले व १२ डिसेंबर ला जो कार्यक्रम होणार होता त्या विषयी मार्गदर्शनपर बोलले, त्यांच्या बोलण्यात ओघानेच बापुरायाचा महिमा हा आलाच, दादा मध्ये मध्ये त्यांच्या संवादात्मक मार्गदर्शनामध्ये श्री साईसतचरित्रा मधील काही संदर्भ ओव्या अगदी समर्पकपणे वापरून बोलत होते,आमच्या औरंगाबादेत जो अनिरुद्ध सोहळा होणार होता त्याचा अधिकाधिक श्रद्धावानांनी लाभ घ्यावा, आपल्या देवाचा महिमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा ह्या ध्यासापोटी बाप्पाच्या ह्या लेकरांनी पुढाकार घेऊन परवानगी काढून १ खास बापुरायाचे प्रवचनकार होण्याचे एक शिबीर घेतले! अगदी प्रथमच असे शिबीर पहिल्यांदा औरंगाबाद मध्ये घेण्यात आले आणि ९४ भक्तांनी त्यात सहभाग घेऊन आपले कार्य पार पडले , त्याचे कौतुक दादांनी केले [ श्रीराम ]. दादा साधारण एक तास बोलले आणि मग जरा विश्रांती होती , त्या वेळी दादांना जवळून भेटण्यासाठी प्रत्येक भक्त अगदी आतुर होता !

त्यानंतर २० मिनिटांच्या ब्रेक नंतर गौरांगसिंह वागळे ह्यांनी जे भक्त प्रवचनकार झाले होते त्यांना अतिशय सुंदर पद्धतीने मार्गदर्शन केले. अगदी एक एक मुद्देसूद गोष्टी समजावून सांगत होते ! त्यांच्या ह्याच बोलण्यातून नवीन आलेले जे भक्त होते त्यांना आपोआप सदगुरू बापू कोण आहेत ?अगदी बापूंच्या शिक्षणापासून ते त्यांच्या सद्य स्थितीतील कार्यापर्यंत ते काय करतात ? ते का आलेत ? ते औरंगाबादला का येणार आहेत ? इत्यादी माहिती मिळाली.

अश्या ह्या कार्यक्रमाचा शेवट बाप्पाच्या लेकरांनी केलेल्या सत्संगामुळे खूपच जोरदार झाला ! लहान असो कि मोठा अगदी प्रत्येक भक्त भक्तिरसात आनंदाने डोलला. अश्या प्रकारे हा कार्यक्रम अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडला ! बापुरायाच्या आगमनाच्या तयारीतील हा खूप मोठा टप्पा होता .......हरी ॐ



हरी ॐ