बापुंची वचने 1)अनिरुद्ध क्षेत्री जो आला शरण,तयासी कैसा भय दुःख भार 2)श्रद्धावान हाची माझा मित्र सखा,तयासी मी रक्षिन देवयान पंथी 3)ग्रंथराज हाची जयाचे अनुसंधान,तयाचा योगशेम मीची वाहे 4)जान मी न कधी टाकीन तुजसी,देईन नित्य मनः सामर्थ्य बल बुद्धि 5)मर्यादा हाची जयाचा तारक मार्ग,तयाचा मी आश्रय सर्वकाळ 6)जो जो मज स्मरे दृढ़भावे,तयासी आनंदघन देईन मी 7)मज सवे जो प्रेमे येइल,तयाचे अशक्य शक्य मी करीन 8)तू वानर मी मित्र तुझा खचित,रावण मरणार जान तू निश्चित 9)जेथ सेवा भक्ति शारन्य राहे,तेथ तेथ दाऊ नंदा अनिरुद्ध राहे

Monday, December 12, 2011

अजि सोनियाचा दिनु .....वर्षे अमृताचा घनु ...Part 2

दिनांक ११ डिसेंबर २०१० बाहेर गावाहून खास अनिरुद्ध उत्सवासाठी आलेल्या माझ्या मित्र परिवाराला माझ्या घरी सोडून मी लगेच सोहळ्याच्या ठिकाणी जायला निघालो ,

तिथे जाऊन व्यासपीठाचे फायनल टच चे काम चालू होते ते अगदी जोमाने पूर्णत्वास नेण्याचा अनिरुद्ध प्रयास आमची टीम करत होती , जशी रात्र होईल तशी थंडी वाढत होती ! मधेच साधारण २ च्या सुमारास ब्रेक घेऊन , सर्व टीम साठी चहा ची फर्माईश पूर्ण करण्यासाठी बस स्थानका वरून चहाची किटलीच घेऊन आलो !  गप्पा मारत , धम्माल करत त्या कडक थंडी मध्ये सर्वांचा चहा झाला  आणि परत कामाला लागलो ! मनात विचार आला अरे मुंबईला थंडी खूपच कमी असते इथे तर भयानक आहे , मनात माझ्या नंदा आईला  ला प्रार्थना केली " आई माझ्या बाळाला स्वेटर घालून , कानाला स्कार्फ बांधून पाठव ग इथे न ख्खुप थंडी ! आणि परत कामात गुंग झालो !.  हम्म.... पण लक्ष सारखे मनगटा वरच्या घड्याळा कडेच होते बरका ! आता वाट होती , ती लाडक्या राजाच्या आगमनाची ! ..... आदल्याच दिवशी मीटिंग मध्ये बापू  केवा कधी कुठे कसा येणार ते आम्हा वानर सैनिकांना समजले होते ! .....

वेळ जाईल तसा उत्साह वाढतच होता , सर्व शहर गाढ झोपेत असताना , साक्षात देवरायाचे आगमन होणार होते. खरच सांगतो कध्धी कध्धी जे स्वप्न पण पहिले नव्हते , ज्याचा कधी विचार पण केला नव्हता ती सुंदर गोष्ट आज घडणार होती , ते आज प्रत्यक्ष ह्या मानव जन्मात अनुभवणार होतो ह्याच विचाराने अंगावर काटा येत होता [ थंडी ने नव्हे ] कशाची थंडी न कशाचे काय , एव्हाना काही बापुभक्त ग्रौन्ड वर हळू हळू जमायला लागले होते वेळ होती पहाटे ३;१५ . आता स्टेज डेकोरेशन टीम ने आजचे काम थांबवायचा निर्णय घेतला . ग्रौन्ड वर आकाशकंदील , पताका लावण्याचे काम सुरु होते, सुरक्षा रक्षक पथक गस्त घालत होते , जमा झालेले बापुभक्त सोल्लिड एक्सायटेड झाले होते ! ब्रम्ह मुहूर्तावर बापुरायचे आगमन होणार होते !

थोडा वेळ सर्वांनी बसून आराम करून लगेच रेल्वे स्टेशन वर जाण्यासाठी आपापल्या बाईक काढल्या आणि अश्या सर्व बाईक वर बाप्पाच्या लेकरांचा जत्था स्टेशन च्या दिशेने निघाला ...! ...... वेळ -३:३५ .
साधारण १५ मिनिटात आम्ही सर्व जण स्टेशन वर पोचलो ! केव्हा एकदा बाईक पार्क करतो आणि आत जातो धावत असे झाले होते ...
रस्त्यात विचार करत होतो कि अरे किती जण आले असतील ? सेवा करून दामले असतील , बापुना भेटायला , पाहायला जमेल का नाही ? एवढ्या पहाटे कडाक्याच्या थंडीत जास्तीत जास्त किती जण येतील पान आत जाऊन पाहतो तर काय ??? जिकडे तिकडे बापुभक्त ! हरी ओम हरी ओम करत पटकन तिकीट विंडो जवळ पोचलो , १- १ जण २०- २० , ३० - ३० प्लात्फ्रोम तिकीट काढत होता  .... पटकन तिकीट काढून प्लाटफॉर्म
 वर गेलो न बघतो तर काय ..... २ तास आधी पासून श्रद्धावान मित्रांनी लांबच्य लांब लाईन लाऊन ठेवल्या होत्या ! बाप्पाची देवगिरी एक्ष्प्रेस्स पलीकडच्या बाजूला येणार होती सो पटकन जिने चढून पलीकडे गेलो आणि उभे राहिलो .! वेळ ४:१०

साधारण ४ : २० च्या सुमारास अनाउन्समेंट व्हायला सुरुवात झाली ...! "कृपया यात्रियो ध्यान दे ,  ट्रेन नंबर ७०५७  देवगिरी एक्स्प्रेस्स प्लाटफॉर्म नंबर ३ पार आयेगी ! हे ऐकताच आमच्या भक्ती सागराला उधाण आले ! जो तो मुंबई हून ट्रेन येण्याच्या दिशेने पाहू लागला , साधारण ३,००० श्रद्धावान एव्हाना जमले होते ..!एवढी गर्दी पाहून स्टेशन वर असलेले सर्व प्रवासी विचारात होते , " अरे इतनी भीड क्यू ही भाई ? इतना बडा कोनसा सेलेब्रिटी आ राहा है....! मनातल्या मनात म्हंटले ... अरे हमारा बॉस आ राहा है ...!  जशी जशी अनाउन्समेंट होत होती तशी तशी दिल कि धडकन तेज हो रही थी ...! आणि तेवढ्यात ... दूरवर ट्रेनचा हेड लाईट  दिसायला लागला ! सर्व स्टेशन वर १ चैतन्याची लहर पसरली !

आणि  ४:३५ ला  ट्रेन स्टेशन मध्ये दाखल झाली ! ..... सर्वांचे मनन होत होते कि धावत धावत जावे न देवाला पहावे पण खरोखर भक्तांनी संयम दाखवला आणि सर्व जण रांगेतच उभे राहिले, आमच्या पैकी काही जण धावलो कारण आम्ही लाईन ने मध्ये नवतो . आणि बाप्पाच्या बोगीपाशी जाऊन उभे राहिलो अन बघतो तर देवबाप्पा मस्त पैकी पांढरे शुभ्र स्वेटर घालून छान  छान गोड हसत बाहेर उतरला ! आणि पटकन सर्वांनी बाप्पा भोवती कडे केले ! आणि लगेच सर्वांनी चालायला सुरुवात केली ..... स्टेशन वर अनेक प्रवासी , लोक झोपलेले होते , कोणी उठले होते कोणी झोपलेलेच होते ... त्यांचाकडे पाहून वाटत होते अरे देवा हि सुद्धा तुझ्हीच लेकरे रे , ह्यांच्या नशिबी तुझ दर्शन का नाही रे, मनात वाईट वाटत होते, बाप्पाच्या  इच्चेनुसार ज्यांचा योग होता ते अगदी उत्सुकतेने पाहत होते  दर्शन घेत होते ! तेच  ते गोड हास्य , तोच तो चैतन्यमयी उत्साह    , आणि तेच प्रेम अहां हा  "....वाहे प्रेमगंगा , तुझ्या महाद्वारी ....अनिरुद्ध तुझा मी किती ऋणी झालो ....... !




अजि सोनियाचा दिनु .....वर्षे अमृताचा घनु ...Part 1

१२ डिसेंबर २००९ ते १२ डिसेंबर २०१० असे हे 365 दिवस आम्ही औरंगाबादकर ज्या क्षणाची अतिशय म्हणजे अतिशय आतुरतेने वाट बघत होतो, तो क्षण म्हणजे १२ डिसेंबर २०१० जसा जसा जवळ येत होता, तस तसे मनाची अवस्था अगदी उन्मनी होत होती , जसे " झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची....!'

ज्या मैदानावर मी लहानपाणी पासून क्रिकेट खेलत होतो , जिथे मी इतर सभा , कार्यक्रमांना जात होतो , त्याच ठिकाणी , त्याच जागी भविष्यात कधी माझ्या लाडक्या बप्पाचा आनंद सोहळा साजरा होइल, माझा बाप्पा इथे साक्षात् येइल असे कधी स्वप्नात ही वाटले नव्हते । आधी औरंगाबाद मधे एखाद्या बाईक वर किवा एखाद्या दुकानात जर बप्पाचा एखादा छोतुसा जरी फोटो कधी दिसला तरी मनन आनंदाने भरून जायच ! पण आता त्याच माझ्या औरंगाबाद मधे माझ्या बापुरायाचे मोट्ठे मोट्ठे पोस्टर्स , होर्डिंग्स आणि मस्त मस्त स्वागत कमानी उभारल्या गेल्या होत्या ! हे सर्व पाहून एक बापू भक्ताला काय आनंद होत असेल ते काही वेगळे सांगायची गरज नाही !

१९९७ पासून बप्पाने आपल्या भक्तिगंगेत मला ओढून घेतले होते , तेवा तीसरी चौथी मधे असें मी बहुतेक , तेवा पासून डिसेंबर २०१० पर्यंत जे जे माझे ओळ्खीचे सर्व होते जसे , नातेवाईक, माझे मित्र परिवार , माझे सर मैडम , कॉलेज आणि शाळेतले दोन्हीही , टूशन मधील सुद्धा ! ह्या सर्वांना मी जे इतके वर्ष ओरडून सांगत होतो की " हां माझा बापू , हाच तो माझा देव ! येस ! " माझा देव अस्सा मझा देव तस्सा ! ते सर्व प्रत्यक्षत अनुभवायची वेळ आता आली होती ! सर्वांना आमंत्रण देऊन झाले होते , देवरायाच्या आगमनाची जोरदार तयारी चालू होती ... १ - १ दिवस युग सारखा वाटत होता ,"  परमात्मया च्या .ओढीने  आत्मा तळ्मळत होता ......."

वर्षभर मनातल्या भक्तिसागरातिल आनंदलहरी ऊसळतच होत्या ! पण जसा जसा डिसेंबर महिना येइल तश्या त्या लहरींची ऊंची अक्षरश: सुनामी सारखी वाढतच चालली होती ! आणि ९ दिसेम्ब्बर पासून तर अहा आहा आनंदच आनंद ! स्टेज च्या तयारी साठी मुंबई हून बाप्पा टीम पाठवणार होता आणि ते आले ! सकाळ, दुपार , रात्र डेकोरेशन चे काम सुरु झाले ! आणि बप्पनी ह्या सेवेत मला सहभागी करून घेतले त्या सुंदर स्टेज च्या मेकिंग्चा एक साक्षीदार होतो मी ....त्याचे काही क्षण ख़ास आपल्या साठी ...!

सर्व शहर अगदी अनिरुद्ध्मय झाले होते , दिनांक ९ डिसेंबर पासून चालू असलेले हे व्यासपीठ बनवण्याचे काम अहोरात्र चालू होते ! माज्याच घरी मी लोज वर रहत असल्यासारखा फ़क्त दिवसातून जमेल तेव्हा फ़क्त तोंड दाखवायला जायचो , कारण मी माझया मुंबईचया आणि पुणे च्या बापू भक्तन्न aaplya मुंबई च्या राजची औरन्गबदेतिल धमाल अनुभावयला आमंत्रित केले होते ! फेसबूक , ओर्कूट वासी माझे मित्र आनी त्यांचे फॅमिली मझच् घरी उतारले होते ! माझीा घरत सुद्धा आग्दि दिवळि पेक्षा जस्त प्रसन्न वातावरण होते सग्ळ्यात भारी गोष्ट म्हण्जे रेडीओ एफ एम वर दिवस भर आपल्या इवेंट बद्दल सारखी माहिती दिली जात होती त्याम्मूळे तरुण वर्गात ही न्यूज फास्ट पसरली ! आणि त्याचा faayda तारीख आणि इवेंट सर्वांच्या निट लक्षात राहिला !