बापुंची वचने 1)अनिरुद्ध क्षेत्री जो आला शरण,तयासी कैसा भय दुःख भार 2)श्रद्धावान हाची माझा मित्र सखा,तयासी मी रक्षिन देवयान पंथी 3)ग्रंथराज हाची जयाचे अनुसंधान,तयाचा योगशेम मीची वाहे 4)जान मी न कधी टाकीन तुजसी,देईन नित्य मनः सामर्थ्य बल बुद्धि 5)मर्यादा हाची जयाचा तारक मार्ग,तयाचा मी आश्रय सर्वकाळ 6)जो जो मज स्मरे दृढ़भावे,तयासी आनंदघन देईन मी 7)मज सवे जो प्रेमे येइल,तयाचे अशक्य शक्य मी करीन 8)तू वानर मी मित्र तुझा खचित,रावण मरणार जान तू निश्चित 9)जेथ सेवा भक्ति शारन्य राहे,तेथ तेथ दाऊ नंदा अनिरुद्ध राहे

Monday, December 12, 2011

अजि सोनियाचा दिनु .....वर्षे अमृताचा घनु ...Part 1

१२ डिसेंबर २००९ ते १२ डिसेंबर २०१० असे हे 365 दिवस आम्ही औरंगाबादकर ज्या क्षणाची अतिशय म्हणजे अतिशय आतुरतेने वाट बघत होतो, तो क्षण म्हणजे १२ डिसेंबर २०१० जसा जसा जवळ येत होता, तस तसे मनाची अवस्था अगदी उन्मनी होत होती , जसे " झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची....!'

ज्या मैदानावर मी लहानपाणी पासून क्रिकेट खेलत होतो , जिथे मी इतर सभा , कार्यक्रमांना जात होतो , त्याच ठिकाणी , त्याच जागी भविष्यात कधी माझ्या लाडक्या बप्पाचा आनंद सोहळा साजरा होइल, माझा बाप्पा इथे साक्षात् येइल असे कधी स्वप्नात ही वाटले नव्हते । आधी औरंगाबाद मधे एखाद्या बाईक वर किवा एखाद्या दुकानात जर बप्पाचा एखादा छोतुसा जरी फोटो कधी दिसला तरी मनन आनंदाने भरून जायच ! पण आता त्याच माझ्या औरंगाबाद मधे माझ्या बापुरायाचे मोट्ठे मोट्ठे पोस्टर्स , होर्डिंग्स आणि मस्त मस्त स्वागत कमानी उभारल्या गेल्या होत्या ! हे सर्व पाहून एक बापू भक्ताला काय आनंद होत असेल ते काही वेगळे सांगायची गरज नाही !

१९९७ पासून बप्पाने आपल्या भक्तिगंगेत मला ओढून घेतले होते , तेवा तीसरी चौथी मधे असें मी बहुतेक , तेवा पासून डिसेंबर २०१० पर्यंत जे जे माझे ओळ्खीचे सर्व होते जसे , नातेवाईक, माझे मित्र परिवार , माझे सर मैडम , कॉलेज आणि शाळेतले दोन्हीही , टूशन मधील सुद्धा ! ह्या सर्वांना मी जे इतके वर्ष ओरडून सांगत होतो की " हां माझा बापू , हाच तो माझा देव ! येस ! " माझा देव अस्सा मझा देव तस्सा ! ते सर्व प्रत्यक्षत अनुभवायची वेळ आता आली होती ! सर्वांना आमंत्रण देऊन झाले होते , देवरायाच्या आगमनाची जोरदार तयारी चालू होती ... १ - १ दिवस युग सारखा वाटत होता ,"  परमात्मया च्या .ओढीने  आत्मा तळ्मळत होता ......."

वर्षभर मनातल्या भक्तिसागरातिल आनंदलहरी ऊसळतच होत्या ! पण जसा जसा डिसेंबर महिना येइल तश्या त्या लहरींची ऊंची अक्षरश: सुनामी सारखी वाढतच चालली होती ! आणि ९ दिसेम्ब्बर पासून तर अहा आहा आनंदच आनंद ! स्टेज च्या तयारी साठी मुंबई हून बाप्पा टीम पाठवणार होता आणि ते आले ! सकाळ, दुपार , रात्र डेकोरेशन चे काम सुरु झाले ! आणि बप्पनी ह्या सेवेत मला सहभागी करून घेतले त्या सुंदर स्टेज च्या मेकिंग्चा एक साक्षीदार होतो मी ....त्याचे काही क्षण ख़ास आपल्या साठी ...!

सर्व शहर अगदी अनिरुद्ध्मय झाले होते , दिनांक ९ डिसेंबर पासून चालू असलेले हे व्यासपीठ बनवण्याचे काम अहोरात्र चालू होते ! माज्याच घरी मी लोज वर रहत असल्यासारखा फ़क्त दिवसातून जमेल तेव्हा फ़क्त तोंड दाखवायला जायचो , कारण मी माझया मुंबईचया आणि पुणे च्या बापू भक्तन्न aaplya मुंबई च्या राजची औरन्गबदेतिल धमाल अनुभावयला आमंत्रित केले होते ! फेसबूक , ओर्कूट वासी माझे मित्र आनी त्यांचे फॅमिली मझच् घरी उतारले होते ! माझीा घरत सुद्धा आग्दि दिवळि पेक्षा जस्त प्रसन्न वातावरण होते सग्ळ्यात भारी गोष्ट म्हण्जे रेडीओ एफ एम वर दिवस भर आपल्या इवेंट बद्दल सारखी माहिती दिली जात होती त्याम्मूळे तरुण वर्गात ही न्यूज फास्ट पसरली ! आणि त्याचा faayda तारीख आणि इवेंट सर्वांच्या निट लक्षात राहिला !





No comments:

Post a Comment